ऋणानुबंध ! नकळत सहज पहिल्यांदा भेटून अनामिक जातं काहीतरी वाटून , सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून , आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून ! असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत, रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत कठीण प्रसंगी भक्कम साथ देत, पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत ! किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची, मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी, प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची , कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची ! कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !! - संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !