Nojoto: Largest Storytelling Platform

गर्दीतला माणूस दारं खिडक्या लावून घरात कोंडून घ

गर्दीतला माणूस

 दारं खिडक्या लावून 
घरात कोंडून घेतलं
 गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं...
काय म्हणे तो
 एक जीवघेणा वायरस 
अरे त्याच वायरसने 
तुला तुझं घर दाखवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं...
घर जणू तुला 
आज नविनच भासलं
 तुझ्या माणसांशी बोलताना 
तुलाच परकेपण जाणवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
आवडी-निवडी तुझ्या
 पुन्हा उफाळून येताना
चिल्ला-पिल्लांना देखील 
तुझं नवल वाटलं 
गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
कितीतरी वर्षांनी 
तिला जवळून पाहिलं 
क्षिणलेल्या तिच्या चेहऱ्याला
तुलाच वाचता आलं 
एका वायरसने बघ तुला तुझं घर दाखवलं 
गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं....
                  कवयित्री- प्रणिता खांबे गर्दीतला माणूस