Nojoto: Largest Storytelling Platform

#PulwamaAttack श्री छत्रपती शिवरायांची जगात आहे की

#PulwamaAttack श्री छत्रपती शिवरायांची जगात आहे कीर्ती 
शिवरायांचं नाव कोरलंय आम्ही काळजावरती
आमच्या देवाचं नाव कोरलंय आम्ही काळजावरती 

वाघाचं काळीज, मर्दाचा बाणा, पोलादी होती छाती 
त्यांची पोलादी होती छाती 
संहार करण्या दृष्टांचा ती भवानी तलवार हाती 
त्यांची भवानी तलवार हाती 
अशा वाघाला,  सारे पाहुनी,  शत्रू असे थरथरती 

अंगात रक्त, सळसळतं फक्त, भगव्या झेंड्यासाठी 
त्या भगव्या झेंड्यासाठी 
शूर हे मावळे, घेऊन बनले, स्वराज्य मराठी 
आपले स्वराज्य मराठी 
शिवसूर्याला, दाही दिशाही, वाकून मुजरा करती 

कापीत सुटल्या यवनांना त्या सळसळत्या समशेरी 
सळसळत्या समशेरी 
भगवे वादळ झुंजले ते गड किल्ल्यांच्या दरीकपारी 
गड किल्ल्यांच्या दरीकपारी 
मन मंदिरी,  मूर्ती साजिरी,  देव शिवराय छत्रपती 

 - श्याम माळी, बदलापूर  9730501029 शिवरायांचं नाव कोरलंय आम्ही काळजावरती

shyammali6385

SHYAM MALI

New Creator

शिवरायांचं नाव कोरलंय आम्ही काळजावरती #PulwamaAttack