Nojoto: Largest Storytelling Platform

थांबणं, वाट पाहणं आणि पुन्हा चालणं म्हणजेच आयुष्य.

थांबणं, वाट पाहणं आणि पुन्हा चालणं म्हणजेच आयुष्य...नाही का...? या कृतींचा अर्थ उलगडण्यात आपलं कुठेतरी चुकतं जसे वाक्य लिहिताना विरामचिन्हे देताना गोंधळ उडून जातो तसे. 
आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यामुळे आपण बिथरतो.आपलं आयुष्य थांबून जातं.
अशावेळी गरजेचं असतं ते आयुष्य थांबू न देता पुन्हा सुरू करणे.
थोडा वेळ थांबायचं असतं तिथे अर्धविराम देऊन पुन्हा आपलं पुढील म्हणणं पूर्ण करतो परंतु काहीजण थोडा वेळ न थांबता एका निरंतर कक्षेत जाऊन जगतात जिथं फारसं हाती काही लागत नाही तर काही पूर्णविराम देऊन नव्या आयुष्याचा आनंद घेतात.
आपल्या आयुष्यात आपण विरामचिन्हे अचूक वापरली तर आपलं आयुष्य नक्कीच आनंदी होईल .
--प्रेरणा #yqtaai #marathi #marathiwriter #thought

yqtaai marathi marathiwriter thought