White कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे ते काहीही असो, आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_qoute रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे