Nojoto: Largest Storytelling Platform

"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो मी मलाच क्षण

"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो
मी मलाच क्षणभर, आज न्याहाळत, होतो

किती स्वप्न, किती गैरसमज पाळत, होतो
रिकाम्या जागा माझ्या मीच गाळत, होतो

कधी हसत होतो कधी अश्रू ढाळत, होतो
जुन्या जखमा त्या पुन्हा कुरवाळत, होतो

नुसत्याच होत्या गप्पा,त्याच त्या दळत, होतो
जरी मी दरिद्र्याच्या, चिखलात लोळत, होतो

शिखरे मनात होती ,वाटेतच अडखळत, होतो
माझ्या निश्चया वर, मीच डळमळत, होतो
 
अपयशाचे भांडवल करून,सदा पळत, होतो
मीच माझ्या आयुष्याशी,कालपर्यंत खेळत, होतो" कवितेचं नाव: आत्मपरीक्षण
"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो
मी मलाच क्षणभर, आज न्याहाळत, होतो

किती स्वप्न, किती गैरसमज पाळत, होतो
रिकाम्या जागा माझ्या मीच गाळत, होतो

कधी हसत होतो कधी अश्रू ढाळत, होतो
जुन्या जखमा त्या पुन्हा कुरवाळत, होतो

नुसत्याच होत्या गप्पा,त्याच त्या दळत, होतो
जरी मी दरिद्र्याच्या, चिखलात लोळत, होतो

शिखरे मनात होती ,वाटेतच अडखळत, होतो
माझ्या निश्चया वर, मीच डळमळत, होतो
 
अपयशाचे भांडवल करून,सदा पळत, होतो
मीच माझ्या आयुष्याशी,कालपर्यंत खेळत, होतो" कवितेचं नाव: आत्मपरीक्षण