Nojoto: Largest Storytelling Platform

"मी निपुत्रिक बरी होते. होत नव्हतं मुलबाळ,जीव व्य

"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा