Nojoto: Largest Storytelling Platform

सुख दुःखाच्या वाटेतील दुःखद क्षण वेचून ती... घेते

सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator

बहिण भावाचे नाते