Nojoto: Largest Storytelling Platform

काय जणू चांदणे डोळ्यांत तुझ्या मी पाहिले बांध सारे

काय जणू चांदणे
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले

स्वप्नातली अप्सराच तू
पायी पैंजण घातले 
स्वर माझ्या तारकांचे
होऊनी गुलाम राहिले

आसमानाच्या स्पर्ध्येला
सह्याद्रीची जणू डोर तू
काळ्याशार नभांवर उमटलेली
चंद्राची जणू कोर तू 

विरलेल्या मृगजळाचा
जणू परिभास मी जाणला
क्षीण झालेल्या देहाला
श्वास कसा तू आणला   

                - गोविंद अनिल पोलाड 
               ( विद्रोही कवी विचारमंच )
काय जणू चांदणे
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले

स्वप्नातली अप्सराच तू
पायी पैंजण घातले 
स्वर माझ्या तारकांचे
होऊनी गुलाम राहिले

आसमानाच्या स्पर्ध्येला
सह्याद्रीची जणू डोर तू
काळ्याशार नभांवर उमटलेली
चंद्राची जणू कोर तू 

विरलेल्या मृगजळाचा
जणू परिभास मी जाणला
क्षीण झालेल्या देहाला
श्वास कसा तू आणला   

                - गोविंद अनिल पोलाड 
               ( विद्रोही कवी विचारमंच )