Nojoto: Largest Storytelling Platform

#घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का??

              आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे. अर्थाजानामध्येही ती पुरुषाएवढीच काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त करताना दिसते. साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ते तिने स्वत:च्या कर्तृत्वाने, कष्टाने, बुद्धीमतेने मिळविलेले आहे. यात शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक वर्गापुरत्या मर्यादित आहेत. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. आजही वर्तमानपत्र उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात. नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्याच जास्त असतात.

             सुशिक्षित वर्गातही पहिली पत्नी सुगरण सुस्वभावी, समजूतदार असली तरीही तिला मुलीचं झाल्या तर तो दोष तिचाच समजून पतीचा दुसरा विवाह लावला जातो. मुलगा व मुलगी होणे हे स्त्रीच्या हातात नसते हे न कळण्या इतपत समाज मागासलेला तर आता नाही ना? तरी पण या ठिकाणी काही गुन्हा नसताना स्त्रीला अन्याय सहन करावा लागतो. साधारणपणे लग्नाला ५-६ वर्षे झाली न घरात पाळणा हलण्याची चिन्हे दिसली नाहीत कि योगीबाबा, डॉक्टर तपासण्या चालू होतात. त्यात प्रथम स्त्रीच्याच केल्या जातात. मुल जन्माला येण्यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार असतात. पण स्त्रीला प्रथम दोष लावण्यात येतो. का? तिच्यात काही दोष नाही असे समजल्यास कसातरी तयार होऊन पुरुष डॉक्टरकडे जायला तयार होतो. या चाचण्यात स्त्रीच्यात दोष निघाला तर पुरुष या कारणावरून तिच्या संमतीने अथवा तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यास सिध्द होतो. पण पुरुषांमध्ये दोष आढळला तर एक तरी स्त्री त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचे आपल्याला आढळते का ??

ऐन तारुण्यात पतीच्या अपघाती निधनाने विधवा झालेल्या मुली आपण पाहतो. मुला बाळ नसेल तर ठीक किमान दुसर्या विवाहाचा विचार तरी केला जातो पण जर पदरी लहान एक दोन मुले असतील तर तिला आपले उभे आयुष्य एकटीने काढावे लागते. तरी ती त्या कच्च्या बछ्याना सांभाळत त्यांचे सगळे करते. मुलांना व्यवस्थित वाढवून त्यांचे शिक्षण वैगरे करून त्यांना मोठ्या हुद्द्यावर बसविलेल्या मतांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण हेच जर एखाद्या पुरुष्याबाबातीत त्याची पत्नी अचानक सोडून गेली तर एका वर्षाच्या आतच त्याच्या दुसर्या लग्नाची बोलणी सुरु केली जाते मुलांना कोण सांभाळणार, घरातले कोण करणार, स्वत:ची सर्वच गरज भागवण्यासाठी दुसरे लग्न करतो. त्यामध्ये त्याचा स्वार्थच असतो सगळा खरे तर! स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाखातर त्याच्या आठवणीवर सगळे आयुष्य काढण्यास तयार होते. त्याच्या मुलांना मोठे करते. स्वताचा विचारही ती कधी करत नाही पण पुरुषांचे तसे नसते.

sandyjournalist7382

sandy

New Creator

#घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का?? आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे. अर्थाजानामध्येही ती पुरुषाएवढीच काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त करताना दिसते. साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ते तिने स्वत:च्या कर्तृत्वाने, कष्टाने, बुद्धीमतेने मिळविलेले आहे. यात शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक वर्गापुरत्या मर्यादित आहेत. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. आजही वर्तमानपत्र उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात. नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्याच जास्त असतात. सुशिक्षित वर्गातही पहिली पत्नी सुगरण सुस्वभावी, समजूतदार असली तरीही तिला मुलीचं झाल्या तर तो दोष तिचाच समजून पतीचा दुसरा विवाह लावला जातो. मुलगा व मुलगी होणे हे स्त्रीच्या हातात नसते हे न कळण्या इतपत समाज मागासलेला तर आता नाही ना? तरी पण या ठिकाणी काही गुन्हा नसताना स्त्रीला अन्याय सहन करावा लागतो. साधारणपणे लग्नाला ५-६ वर्षे झाली न घरात पाळणा हलण्याची चिन्हे दिसली नाहीत कि योगीबाबा, डॉक्टर तपासण्या चालू होतात. त्यात प्रथम स्त्रीच्याच केल्या जातात. मुल जन्माला येण्यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार असतात. पण स्त्रीला प्रथम दोष लावण्यात येतो. का? तिच्यात काही दोष नाही असे समजल्यास कसातरी तयार होऊन पुरुष डॉक्टरकडे जायला तयार होतो. या चाचण्यात स्त्रीच्यात दोष निघाला तर पुरुष या कारणावरून तिच्या संमतीने अथवा तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यास सिध्द होतो. पण पुरुषांमध्ये दोष आढळला तर एक तरी स्त्री त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचे आपल्याला आढळते का ?? ऐन तारुण्यात पतीच्या अपघाती निधनाने विधवा झालेल्या मुली आपण पाहतो. मुला बाळ नसेल तर ठीक किमान दुसर्या विवाहाचा विचार तरी केला जातो पण जर पदरी लहान एक दोन मुले असतील तर तिला आपले उभे आयुष्य एकटीने काढावे लागते. तरी ती त्या कच्च्या बछ्याना सांभाळत त्यांचे सगळे करते. मुलांना व्यवस्थित वाढवून त्यांचे शिक्षण वैगरे करून त्यांना मोठ्या हुद्द्यावर बसविलेल्या मतांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण हेच जर एखाद्या पुरुष्याबाबातीत त्याची पत्नी अचानक सोडून गेली तर एका वर्षाच्या आतच त्याच्या दुसर्या लग्नाची बोलणी सुरु केली जाते मुलांना कोण सांभाळणार, घरातले कोण करणार, स्वत:ची सर्वच गरज भागवण्यासाठी दुसरे लग्न करतो. त्यामध्ये त्याचा स्वार्थच असतो सगळा खरे तर! स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाखातर त्याच्या आठवणीवर सगळे आयुष्य काढण्यास तयार होते. त्याच्या मुलांना मोठे करते. स्वताचा विचारही ती कधी करत नाही पण पुरुषांचे तसे नसते. #story #nojotophoto