Nojoto: Largest Storytelling Platform

White मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान म

White मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभिमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख-दु:ख
मैत्री म्हणजे हर्ष
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वाराची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

आज रविवारी साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! विष्णु बानाईतकर

©‼️प्रणाली कावळे‼️ #Thinking  रवी राजदेव  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Sandeep Pandey  Shoaib Shaikh  Akash Yado
White मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभिमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख-दु:ख
मैत्री म्हणजे हर्ष
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वाराची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

आज रविवारी साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! विष्णु बानाईतकर

©‼️प्रणाली कावळे‼️ #Thinking  रवी राजदेव  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Sandeep Pandey  Shoaib Shaikh  Akash Yado