Nojoto: Largest Storytelling Platform

*तु फक्त हो म्हण..* तु फक्त हो म्हण, बाकी मी बघून

*तु फक्त हो म्हण..*

तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..
तु सोबत असलीस की,
आनंदाचे क्षण जगून घेईन..

मनातलं कोडं मी सोडून देईन,
मनाला मन मी जोडून पाहीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

असतात गं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे,
गुणदोषासह तरीही तुला काळजात कोरून ठेवीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

कधीतरी वाटतं,
कुणीतरी आपलं हक्काचं असावं,
काळजात कायमचं घर करून बसावं..
म्हणुन म्हणतो,
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन,

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve #तु फक्त हो म्हण
*तु फक्त हो म्हण..*

तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..
तु सोबत असलीस की,
आनंदाचे क्षण जगून घेईन..

मनातलं कोडं मी सोडून देईन,
मनाला मन मी जोडून पाहीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

असतात गं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे,
गुणदोषासह तरीही तुला काळजात कोरून ठेवीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

कधीतरी वाटतं,
कुणीतरी आपलं हक्काचं असावं,
काळजात कायमचं घर करून बसावं..
म्हणुन म्हणतो,
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन,

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve #तु फक्त हो म्हण
vikassalve3012

Vikas Salve

New Creator

#तु फक्त हो म्हण