"होय तर तुला, म्हणावंच लागेल नाही म्हणून, कसं चालेल रोजची 'ती' सकाळ आजही आठवते पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी फसेल म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल आहे का काही उपाय सुचव तूच जरा एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे, तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे या रस्त्यानं तुला स्वर्गसुख लाभेल त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल तुलाही कळते आहे प्रेम माझे तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे नाही म्हणून, अशी छळू नकोस विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस एवढ प्रेम तुला कोण गं करेल शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#