Nojoto: Largest Storytelling Platform

माझं अस काहीच नाही उरलं सर्व काही वजा च होत गेलं ।

माझं अस काहीच नाही उरलं
सर्व काही वजा च होत गेलं ।।
जन्माला आले तेव्हा, देवाने
त्याच्याकडून वजा केलं ।।
तारुण्य आलं तेव्हा, जेव्हा
बालपण वजा झालं ।।
जबाबदाऱ्या कळायला लागल्या
जेव्हा अल्लडपणा, निरागसपणा वजा झालं ।।
नवऱ्याकडे गेले तेव्हा,जेव्हा
बापाने, वजा केलं ।।
सर्व संकटांना सामोरी जाऊ लागले
जेव्हा, सुखाला वजा केलं ।।
अश्रू जवळचे वाटू लागले
जेव्हा हसणं आयुष्यातून वजा झालं ।।
एक गोष्ट भेटते, पण त्याचक्षणी
असलेली गोष्ट वजा होऊन जाते ।।
         -.....©✍️पूजा डोमाळे (राणू) #वजा #मराठीकविता
माझं अस काहीच नाही उरलं
सर्व काही वजा च होत गेलं ।।
जन्माला आले तेव्हा, देवाने
त्याच्याकडून वजा केलं ।।
तारुण्य आलं तेव्हा, जेव्हा
बालपण वजा झालं ।।
जबाबदाऱ्या कळायला लागल्या
जेव्हा अल्लडपणा, निरागसपणा वजा झालं ।।
नवऱ्याकडे गेले तेव्हा,जेव्हा
बापाने, वजा केलं ।।
सर्व संकटांना सामोरी जाऊ लागले
जेव्हा, सुखाला वजा केलं ।।
अश्रू जवळचे वाटू लागले
जेव्हा हसणं आयुष्यातून वजा झालं ।।
एक गोष्ट भेटते, पण त्याचक्षणी
असलेली गोष्ट वजा होऊन जाते ।।
         -.....©✍️पूजा डोमाळे (राणू) #वजा #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator