Nojoto: Largest Storytelling Platform

#ज्याचा त्याचा प्रश्न चांगल्या माणसांचं सगळं चांगल

#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल