Nojoto: Largest Storytelling Platform

मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दि

मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्हीटी येते, गाणी पहायची तर ब्रेक्सच्या भडिमाराने टीव्ही पाहणं नकोस होऊन जातं.मी सरळ फूड फूड चॅनल लावला.त्यात संजीव कपूर यांचा शो सुरू होता.दाल पराठाची रेसिपी ते दाखवत होते.पराठा तव्यावर भाजत असताना ते म्हणाले "पराठ्यावर जेव्हा तुम्ही फॅट्स अर्थात तेल,बटर,तूप लावता तेव्हा चटकन  तुमचा शेजारी समजून जातो, आज शेजारी पराठे बनत आहेत."

दिवस असो वा रात्र आपल्या मनातही कितीतरी विचार शिजत असतात...कमाल तर तेव्हा असते विचार तेच असतात पण रोज काहीतरी आगळीवेगळी रेसिपी बनत असते.आपल्या मनातल्या खिडक्या इतक्या भक्कम असतात.मनात विचारांच्या कुठल्या रेसिपीज शिजत आहेत त्याचा आपल्या भोवताली असणाऱ्या लोकांना सुगावाही लागत नाही..जी रेसिपी बनते तिचा आपल्याशिवाय दुसरं कोणीच आस्वाद घेत नसतं.
जरी घेतला तरी क्वचितच कुणाला ती रेसिपी रुचकर लागत असते...
--प्रेरणा