Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं.. जवळ अनं समोर

एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं..
जवळ अनं समोर नसला तरी 
हृदयात अनं सोबत फक्त तोच असावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
सगळं जवळ असताना सुद्धा 
तो बोलत नसताना तो नजरेसमोर नसताना 
त्याचीच कमी असल्याचं भासावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
आयुष्यात सगळं काही मिळालं असलं तरी 
त्याच्या विरहात जगताना 
मरण आल्यासारखं वाटावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
कधी कोणासमोर तोंडातून आवाज जरी निघाला नसला 
तरी त्याच्यासाठी साऱ्या जगाशी भांडावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
की,तो आयुष्यात सोबत असताना 
दुसऱ्या कुणाकडे नजर उचलून सुद्धा नको बघावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा 
कधीच स्वप्न सुद्धा नाही यावं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  loves quotes love status quote on love
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं..
जवळ अनं समोर नसला तरी 
हृदयात अनं सोबत फक्त तोच असावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
सगळं जवळ असताना सुद्धा 
तो बोलत नसताना तो नजरेसमोर नसताना 
त्याचीच कमी असल्याचं भासावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
आयुष्यात सगळं काही मिळालं असलं तरी 
त्याच्या विरहात जगताना 
मरण आल्यासारखं वाटावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
कधी कोणासमोर तोंडातून आवाज जरी निघाला नसला 
तरी त्याच्यासाठी साऱ्या जगाशी भांडावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
की,तो आयुष्यात सोबत असताना 
दुसऱ्या कुणाकडे नजर उचलून सुद्धा नको बघावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा 
कधीच स्वप्न सुद्धा नाही यावं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  loves quotes love status quote on love