White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही... जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही... कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही... प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता