Nojoto: Largest Storytelling Platform

°कंदील° होता कंदील त्या रात्री तम टिपण्या समर्थ

°कंदील°

होता कंदील त्या रात्री 
तम टिपण्या समर्थ 
होते त्याविन जगणे 
आम्हां तुम्हांस ते व्यर्थ 

वात कसली हो त्याला 
एक चिंधी जुनेऱ्याची
तरी कशी रुबाबात 
करी सोय प्रकाशाची 

एक कुटुंब वत्सल 
असे ओळख तयाची
साथ देई अंधारात 
रोज माझी नि तुमची 

साथ सोबत असता
भीती ना विंचूकाट्याची 
काय आणि किती सांगू 
तुम्हा मी महती त्याची 

असे भोवती गराडा 
अभ्यासाला जेवणाला 
नसे प्रकाश कोरडा 
कितीकही काजळला  

कधी नसे त्याचा खाडा 
रोज रातीचा सोबती 
होती एकेकाळी त्याची 
लई लई शिरिमंती 
 
•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav #कंदील...एक अंधाराचा सोबती.
°कंदील°

होता कंदील त्या रात्री 
तम टिपण्या समर्थ 
होते त्याविन जगणे 
आम्हां तुम्हांस ते व्यर्थ 

वात कसली हो त्याला 
एक चिंधी जुनेऱ्याची
तरी कशी रुबाबात 
करी सोय प्रकाशाची 

एक कुटुंब वत्सल 
असे ओळख तयाची
साथ देई अंधारात 
रोज माझी नि तुमची 

साथ सोबत असता
भीती ना विंचूकाट्याची 
काय आणि किती सांगू 
तुम्हा मी महती त्याची 

असे भोवती गराडा 
अभ्यासाला जेवणाला 
नसे प्रकाश कोरडा 
कितीकही काजळला  

कधी नसे त्याचा खाडा 
रोज रातीचा सोबती 
होती एकेकाळी त्याची 
लई लई शिरिमंती 
 
•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav #कंदील...एक अंधाराचा सोबती.