Nojoto: Largest Storytelling Platform

आली आली दिपावली दारी रंगांची रांगोळी लावू आकाश क

आली आली दिपावली 
दारी रंगांची रांगोळी 
लावू आकाश कंदील 
दीप तेज रोषणाई 

वसु बारस पहिली
हळ्दी कुंकाचे औक्षण 
करू गोधनाची पूजा 
ओवाळूनी निरांजन 

पुढे धन त्रयोदशी  
धन्वंतरी पावो खास 
साऱ्या साऱ्या कुटुंबाला
लाभो निरामय वास 

येता नर्क चतुर्दशी 
होते अभ्यंगाचे स्नान 
पाप वासनांचा नाश
अहंकार उच्चाटन

मग येई अमावस्या 
करू लक्ष्मीचे पूजन 
होवो धनधान्या वृध्दी 
मनोमनी हे चिंतन

पुढे बली प्रतिपदा 
सुरू होते नववर्ष 
नव्या आशा नि आकांक्षा 
तन मना होई हर्ष 

भाऊबीज ती शेवटी
भावा बहिणीचा थाट 
कशी बंधुशी ओवाळी
चिंतूनिया प्रेमगाठ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav #Diwali #दीपावली  #kavita #कविता #Hinduism
आली आली दिपावली 
दारी रंगांची रांगोळी 
लावू आकाश कंदील 
दीप तेज रोषणाई 

वसु बारस पहिली
हळ्दी कुंकाचे औक्षण 
करू गोधनाची पूजा 
ओवाळूनी निरांजन 

पुढे धन त्रयोदशी  
धन्वंतरी पावो खास 
साऱ्या साऱ्या कुटुंबाला
लाभो निरामय वास 

येता नर्क चतुर्दशी 
होते अभ्यंगाचे स्नान 
पाप वासनांचा नाश
अहंकार उच्चाटन

मग येई अमावस्या 
करू लक्ष्मीचे पूजन 
होवो धनधान्या वृध्दी 
मनोमनी हे चिंतन

पुढे बली प्रतिपदा 
सुरू होते नववर्ष 
नव्या आशा नि आकांक्षा 
तन मना होई हर्ष 

भाऊबीज ती शेवटी
भावा बहिणीचा थाट 
कशी बंधुशी ओवाळी
चिंतूनिया प्रेमगाठ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav #Diwali #दीपावली  #kavita #कविता #Hinduism