Nojoto: Largest Storytelling Platform

शाळेतील आठवणी..... आठव

शाळेतील आठवणी.....


                          आठवतंय ना..!

मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलणं, लहान होतो खूप...
 Simple तशी hairstyle आणि गोंडस असं रुप...

शाळेत जायची करायचो भलतीच घाई...
थोडा जरी झाला उशीर, तर छडीने मारायच्या ना बाई...
         
                                                        आमचा group म्हणजे तिन मुले आणि पाच मूली...
                                                                     खेळाच्या तासातला आवडता खेळ म्हणजे वाघ-शेळी...

                                          Daily चा पोषक आहार निरनिराळा, 
‌                                           दुपारच्या‌ जेवणाची न्यारीच गंमत...
                                   तीस मुलांचा पट आणि,
                                           जेवायला बसायची भली मोठी पंगत...

गुरुजी तसे शांत स्वभावाचे,
शिस्तदेखील तशी कडकच म्हणा...
म्हणूनच तर जेवणाच्या सुरुवातीला.
 न चुकता जोराने म्हणायचो प्रार्थना...

त्यानंतरची पहिली धाव, ती म्हणजे माझ्या घरी...
एकच तासाची मधली सुट्टी ज्यात बघायचो,
शकालका बूमबूम आणि ज्यादू की छडी घुमानेवाली सोनपरी...

                               गप्पांचा अड्डा म्हणजे वडाच झाड,
                                 तिथेच खेळायचो मामाच पत्र...
                                  कितिजरी धडपडलो, कितीही रडलो,
                                              तरी नव्या आशेने पुन्हा यायचो एकत्र...

शाळेतील दिवस जणू छोटासा वाहणारा झरा, त्यातील निर्मळ पाणी...
प्रत्येकाच्या हृदयात वाहतात, अशा निखळ आणि स्वच्छंद आठवणी...


                                                                                                                                   -संचिता केकाणे #bachpankiyadein
शाळेतील आठवणी.....


                          आठवतंय ना..!

मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलणं, लहान होतो खूप...
 Simple तशी hairstyle आणि गोंडस असं रुप...

शाळेत जायची करायचो भलतीच घाई...
थोडा जरी झाला उशीर, तर छडीने मारायच्या ना बाई...
         
                                                        आमचा group म्हणजे तिन मुले आणि पाच मूली...
                                                                     खेळाच्या तासातला आवडता खेळ म्हणजे वाघ-शेळी...

                                          Daily चा पोषक आहार निरनिराळा, 
‌                                           दुपारच्या‌ जेवणाची न्यारीच गंमत...
                                   तीस मुलांचा पट आणि,
                                           जेवायला बसायची भली मोठी पंगत...

गुरुजी तसे शांत स्वभावाचे,
शिस्तदेखील तशी कडकच म्हणा...
म्हणूनच तर जेवणाच्या सुरुवातीला.
 न चुकता जोराने म्हणायचो प्रार्थना...

त्यानंतरची पहिली धाव, ती म्हणजे माझ्या घरी...
एकच तासाची मधली सुट्टी ज्यात बघायचो,
शकालका बूमबूम आणि ज्यादू की छडी घुमानेवाली सोनपरी...

                               गप्पांचा अड्डा म्हणजे वडाच झाड,
                                 तिथेच खेळायचो मामाच पत्र...
                                  कितिजरी धडपडलो, कितीही रडलो,
                                              तरी नव्या आशेने पुन्हा यायचो एकत्र...

शाळेतील दिवस जणू छोटासा वाहणारा झरा, त्यातील निर्मळ पाणी...
प्रत्येकाच्या हृदयात वाहतात, अशा निखळ आणि स्वच्छंद आठवणी...


                                                                                                                                   -संचिता केकाणे #bachpankiyadein