Nojoto: Largest Storytelling Platform

#पाऊसझूला मंद धुंद वारा वाजवी पावा भोवताली आनंद भ

#पाऊसझूला
मंद धुंद वारा वाजवी पावा भोवताली 
आनंद भरल्या श्रावणाची ही पहाट आली
मृदू लवलवत्या पात्याची श्रावणी चालली थरथर
दवबिंदूचे चुंबन वारा ही भरभर
मास हा उत्सवाचा सुवासिनीच्या गर्वाचा
सडा गं पडणार सखे आनंदाच्या पर्वाचा
अलगद मनी सुखावती त्या श्रावणसरी
मोत्यांच्या  माळेतली बने गुंफण भारी
इंद्रधनुष्याचे रंग मना स्पर्शून जाते
अशा श्रावणी पहाटे चित्त हर्षून जाते 
चमचमत्या शालूत लक्ष्मी घेते पदर
आकाशी वैष्णवांचा मेळा आनंदे भरपूर
सडासंमार्जन करती लगबग स्वागतार्ह श्रावणाच्या
कल्पकतेची गोंदून रांगोळी लेण्या सौभाग्याच्या
छान तृणावर डोले लाजून वेलीवरची कळी
सुवासिनीच्या मुक्तहास्याने पडते गाली खळी
रानमेवा हा खुणावतो रानोरानी अन् मनात
पक्ष्यांची मंजूळ किलबिल घुमतेय रानात
मोर नाचरा फेर धरुनी नुतन मनमंदिरी
मखमली हा मास लाभला झेलू श्रावणसरी
रंग बहरले इथे फुलात रमलो वृंदावनी
खेळ खेळती पाऊसझूला सार्‍याच गवळणी
उगवला तो सूर्य सखा गं तेजस्वी गंधफूला
आपण दोघी कोकीळमैना झुलवू पाऊसझूला
बोल घेवडा बनला भाट मनी एकच इच्छा
ओल्याचिंब पावसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा
#पाऊसझूला
मंद धुंद वारा वाजवी पावा भोवताली 
आनंद भरल्या श्रावणाची ही पहाट आली
मृदू लवलवत्या पात्याची श्रावणी चालली थरथर
दवबिंदूचे चुंबन वारा ही भरभर
मास हा उत्सवाचा सुवासिनीच्या गर्वाचा
सडा गं पडणार सखे आनंदाच्या पर्वाचा
अलगद मनी सुखावती त्या श्रावणसरी
मोत्यांच्या  माळेतली बने गुंफण भारी
इंद्रधनुष्याचे रंग मना स्पर्शून जाते
अशा श्रावणी पहाटे चित्त हर्षून जाते 
चमचमत्या शालूत लक्ष्मी घेते पदर
आकाशी वैष्णवांचा मेळा आनंदे भरपूर
सडासंमार्जन करती लगबग स्वागतार्ह श्रावणाच्या
कल्पकतेची गोंदून रांगोळी लेण्या सौभाग्याच्या
छान तृणावर डोले लाजून वेलीवरची कळी
सुवासिनीच्या मुक्तहास्याने पडते गाली खळी
रानमेवा हा खुणावतो रानोरानी अन् मनात
पक्ष्यांची मंजूळ किलबिल घुमतेय रानात
मोर नाचरा फेर धरुनी नुतन मनमंदिरी
मखमली हा मास लाभला झेलू श्रावणसरी
रंग बहरले इथे फुलात रमलो वृंदावनी
खेळ खेळती पाऊसझूला सार्‍याच गवळणी
उगवला तो सूर्य सखा गं तेजस्वी गंधफूला
आपण दोघी कोकीळमैना झुलवू पाऊसझूला
बोल घेवडा बनला भाट मनी एकच इच्छा
ओल्याचिंब पावसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा