Nojoto: Largest Storytelling Platform

सोडा त्या निष्पाप कळ्या जागवा तुमची माणुसकी अजुनी

सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या विषयावर लिहुया,व्यक्त होऊया.
#निष्पाप #कळ्या
#collab #yqtaai
सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या विषयावर लिहुया,व्यक्त होऊया.
#निष्पाप #कळ्या
#collab #yqtaai