एक - दोन दिवसाच्या भेटीत कोण कोणाला ओळखणार आहे एक-दोन दिवसाच्या बोलण्याने कोण कोणाला पारखणार आहे कोणाचा स्वभाव कसा हे सहज कसं कळणार आहे भविष्याचं कोणाला माहिती वागणूक कशी मिळणार आहे जास्त बोलू देणं फार महत्वाचं आहे तेव्हाच तर बोलण्याने व्यक्ती कळणार आहे दोन दिवसाच्या गोड बोलण्याने त्याच्या मनात काय हे कसं कळणार आहे अनेक वर्ष सोबत राहून माणूस कधी कळला नाही भेटल्यानंतर लगेच कोण कसं कळणार आहे अनेक वर्ष सोबत घालविलेल्या नात्यावर विश्वास नाही अनोळखी माणसांवर लगेच विश्वास कसा बसणार आहे प्रेम करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा मग लोकांना प्रेम कसं कळणार आहे पैसा संपत्ती जात पाहून नातं जोडतो ना आपण मग आपल्याला त्याबदल्यात प्रेम कसं मिळणार आहे जग चंद्र सूर्यावर पोहोचले असताना आपल्याला जात धर्म पैसा हाच अनुभव मिळणार आहे भविष्यात प्रेमाला अस्तित्व असणार की नाही की संपूर्ण जात धर्म ढळणार आणि आपलं अशिक्षितपणा पुढच्या पिढीला उदाहरण म्हणून उरणार आहे..... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Youme love quotes life quotes