Nojoto: Largest Storytelling Platform

रूप असे तुझे चंडिका, अन तूच तू भवानी होऊन महिषासुर

रूप असे तुझे चंडिका, अन तूच तू भवानी
होऊन महिषासुरमर्दिनी ये तू आज धावूनी

व्याकुळले मन माझे, तुला साद घालते आई 
तुझ्याविना माझा, आता कोणी कैवारी नाही

विनाश करत असे अपार वाढती दुष्कर्म तयाचे
क्रोधाच्या उठती ज्वाला अन धगधग मनात साचे

तुला पदर पसरते आई जाणून माझी तू भक्ती घे
नाश करण्या राक्षसाचा मला तूच आता शक्ती दे

-Siddhi Rahate