यांनी पाकिस्तान वर बोलायच, यांनी बलुचिस्तानवर बोलायचं, यांनी अफगाणीस्तानवर बोलायचं, यांनी इराण इराक इस्त्राईल सगळ्यांवर बोलायचं, यांनी अमेरीकेच्या निवडणुकीचा प्रचार करायचा, यांनी ट्रम्प मागे गोंडा घोळवत फिरायचं, यांनी अमेरीकेच्या निवडणुकीवर निबंध लिहायचे, यांनी जगभरातल्या मुसलमानांची चिकित्सा करायची, पाकिस्तान मधल्या मंदीरा साठी इथे गळे काढून छाती पिटून घ्यायची, यांच्या एनआरआय बछड्यांनी फेक अकाऊंट काढून आमच्या राजकारणावर बोलायचं, चार पैशांसाठी स्वताच्या देशाला फाट्यावर मारुन दूसर्या देशाचं नागरिकत्व घेतलेल्या विदेशी लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवायची. यांच्या मुलांनी शिक्षणासाठी लंडन, अमेरिका, कॅनडा गाठायचं. भेंडी तुमची औकात तरी आहे का इथल्या शेतकर्यांना देशाचं सार्वभौमत्व शिकवायची. तुमचा राष्ट्रवाद बोगस आण तुमचं देशप्रेम पण बोगस. तुमच्या बोगस लोकांच्या बोगस ट्विट्स मधे आम्हाला काडीचं स्वारस्य नाही. आम्ही आमच्या शेतकर्यासोबत आहोत आणि रहाणार. #IStandWithFarmers ©Farukh Maniyar #WallTexture