एक "प्रेयसी" माहीत नसलेली "प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी प्रेयसी नक्कीच असते, जी गुपचूप आपल्यावर प्रेम करत असते, आपल्या नकळत, ती कधीच कळू देत नाही तिच्या मनातलं प्रेम , तुमच्या साठी असलेला प्रेमाचा सागर हा तिचाच असतो एकटीचा, तिला कधी हे प्रेम व्यक्त ही करायचं नसतं ते तुम्ही समजून घ्यावं असं मात्र तिला वाटत असतं ती आपल्या परीचयाचीच असते mostly, ती तुमचा शब्द कधीच टाळत नाही आणि,नेहमी मदतीसाठी तयार असते, नेहमी तुमच्या बाजूने उभी, चूक काय आणि बरोबर काय याच्याशी काही संबध नसतो तिचा, तुमच्या पाठीशी उभं राहणं, एवढंच तिला माहीत असतं, तुला अमुक अमुक रंग, खूप छान दिसेल किंवा तमुक तमुक छान दिसणार नाही एवढं बोलण्याचा अधिकार ती दाखवत नाही,कारण तुमचं दिसणं ही तिच्यासाठी जास्त महत्वाचं नसत, तुमच्या खऱ्या प्रेयसी विषयी देखील, तिला प्रेम असतं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विषयी प्रेमअसतं त्या सर्वांवर तिचे प्रेम असते,ती तुमच्यासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मैत्रीण असते बास..... आपलं तिच्याकडे कधीच लक्ष नसतं, ही 'प्रेयसी' आयुष्याच्या कुठल्या वळणार तुमच्या सोबत असेल सांगणं कठीण, आहे पण ती आपल्या आयुष्यात असते नक्की, हे वाचत असताना तिचं चित्र तुम्हाला नक्की दिसलं असेल...... आज मी माझ्या "त्या" प्रेयसीला i love you 😔आणि thank you म्हणतो ---योगेश हिवराळे--- #एक #प्रेयसी #माहीत #नसलेली