#शेतकरी राजा 👑 तू लेक काळया मातीचा मर्द रांगड्या छातीचा पोशिंदा तू जगाचा मानकरी तू कामाचा कष्ट नशिबी तुझ्या फक्त पेरायचंआणि काढायचं तू नुसत घामाचं शून्य मोल तुझ्या बेभाव जातो माल निसर्गाचा समतोल बिघडला की होतात तुझे हाल अंधाऱ्या राती सोबतीला विंचव आणि साप तरी दुसर्याच्या हाती तुझ्या किमतीच माप सर्जा राजाची नादर गाडी तुझी वेगळाच थाट राबतोस कळ्या आईसाठी म्हणूनच देशाचा कणा आहेत ताट ©Sanika Gaikwad शेतकरी