Nojoto: Largest Storytelling Platform

परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर

परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम रुमपर्यंत नेईपर्यंत गंमत येते विद्यार्थ्यांचे संवाद ऐकताना , तर कधी रागही येतो.
प्रश्नपत्रिका हातात आली की वर्गात डिस्कस केलेले प्रश्न आले तर मुलांचा हुरुप वाढतो.त्यांचा हा हुरुप फार काळ टिकत नाही.पेपर लिहिताना इकडे तिकडे पहायचं किंवा होईल ना पेपर हा अतिआत्मविश्वास , अतिउत्साहीपणा घात करतो.अन् मग हातचे गुण एक्जामिनरच्या झोळीत जातात.
आपल्या सोबतही असंच होतं.आपल्याला वाटतं आपल्या अवतीभवती चहूकडे माणसांचा पसारा आहे.आपण एकटं पडण्याची शक्यता तशी धूसर.किंबहुना या शक्यतेचा विचारच करत नाही.
परंतु वेळ...! 
वेळ सगळे गैरसमज क्षणात दूर करते.आपलं कोण ,परकं कोण वेळ बरोबर दाखवून देते. आपली माणसं परकी होतात तेव्हा काय करायचं ? दुःखी व्हायचं ? त्यांच्यासाठी रडायचं ? आपण आपलं जगणं सोडून द्यायचं ? पुन्हा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही ? बिल्कुल नाही...
परीक्षेचा एक पेपर मनासारखा गेला नाही म्हणून आपण पुढल्या पेपरचा अभ्यास करणं सोडत नाही.आपण पुढल्या पेपरचा दुप्पट जिद्दीने अभ्यास करतो.कुठल्याही अतिउत्साहाच्या किंवा 
अतिआत्मविश्वासाच्या डोहात न बुडता पेपर संपेपर्यंत आपण त्या पेपरला शंभर टक्के देतो.
शांत राहून पेपर सोडवणं जसं जरुरीचं असतं तसं प्रत्येक प्रसंगी व्यक्त व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही.शांत राहून समस्यांचं चुटकीसरशी निराकरण होऊ शकतं..या निमित्ताने कुठेतरी आपली मनःशांती भंग होणार नाही...नाही का ???

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम रुमपर्यंत नेईपर्यंत गंमत येते विद्यार्थ्यांचे संवाद ऐकताना , तर कधी रागही येतो. प्रश्नपत्रिका हातात आली की वर्गात डिस्कस केलेले प्रश्न आले तर मुलांचा हुरुप वाढतो.त्यांचा हा हुरुप फार काळ टिकत नाही.पेपर लिहिताना इकडे तिकडे पहायचं किंवा होईल ना पेपर हा अतिआत्मविश्वास , अतिउत्साहीपणा घात करतो.अन् मग हातचे गुण एक्जामिनरच्या झोळीत जातात. आपल्या सोबतही असंच होतं.आपल्याला वाटतं आपल्या अवतीभवती चहूकडे माणसांचा पसारा आहे.आपण एकटं पडण्याची शक्यता तशी धूसर.किंबहुना या शक्यतेचा विचारच करत नाही. परंतु वेळ...! वेळ सगळे गैरसमज क्षणात दूर करते.आपलं कोण ,परकं कोण वेळ बरोबर दाखवून देते. आपली माणसं परकी होतात तेव्हा काय करायचं ? दुःखी व्हायचं ? त्यांच्यासाठी रडायचं ? आपण आपलं जगणं सोडून द्यायचं ? पुन्हा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही ? बिल्कुल नाही... परीक्षेचा एक पेपर मनासारखा गेला नाही म्हणून आपण पुढल्या पेपरचा अभ्यास करणं सोडत नाही.आपण पुढल्या पेपरचा दुप्पट जिद्दीने अभ्यास करतो.कुठल्याही अतिउत्साहाच्या किंवा अतिआत्मविश्वासाच्या डोहात न बुडता पेपर संपेपर्यंत आपण त्या पेपरला शंभर टक्के देतो. शांत राहून पेपर सोडवणं जसं जरुरीचं असतं तसं प्रत्येक प्रसंगी व्यक्त व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही.शांत राहून समस्यांचं चुटकीसरशी निराकरण होऊ शकतं..या निमित्ताने कुठेतरी आपली मनःशांती भंग होणार नाही...नाही का ???