Nojoto: Largest Storytelling Platform

भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅ

 भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! 
"काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्हणत, वैदेही हुमसत - हुमसत डाॅक्टरांशी बोलत होती.

"हे बघा ताई !  आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत पण अपघात खुप मोठा झालाय आणि तुम्ही तर सगळं बघतच आहात " म्हणत डाॅक्टर हताशपणे तिथून निघून गेले. 

वैदेही कितीतरी वेळ डाॅक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच बसली होती. हतबलता काय असते याचा जवळून अनुभव घेत वैदेही तीथल्याच एका खुर्चीवर मटकन बसली. समोरच असलेल्या आयसीयूच्या बाहेरून दिसणाऱ्या काचेकडे ती शुन्यात नजर लाऊन बसली होती. अचानक काहीतरी व्हावं आणि भयानक अपघातातून तिचा मुलगा आणि तिचा नवरा वाचावा एवढीच तिच्या मनाची हाक होती. 

दिवसांमागून दिवस जात होते. डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते. आतापर्यंत सतत हाॅस्पीटलला येऊन नातेवाईकही आता कंटाळले होते, वैदेहीला सासू-सासरे नव्हते आणि बरेच नातेवाईक येऊन भेटून जात होते पण आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. वैदेहीचे आईवडील होते, त्यांनी तीला बराच आधारही दिला होता पण शेवटी त्यांनाही त्यांची कामं होतीच की, असं कीती दिवस ते तीला सोबत करणार होते म्हणून स्वतः वैदेहीनेच त्यांना जायला सांगितलं. आता सगळे खटाटोप ती स्वतः च करत होती शेवटी लोकांची मदत तीला कीती दिवस पुरणार होती?......

sandyjournalist7382

sandy

New Creator