Nojoto: Largest Storytelling Platform

प्रकाशमयी उषःकाल.. हर्षोल्हासाचा बहर.. मनामनात लहर

प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहक  क्षणाला..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. स्वप्न.
प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहक  क्षणाला..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. स्वप्न.