Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाचे हे क्षण प्रेमाचे हे क्षण अमूल्य असतात न

प्रेमाचे हे क्षण
प्रेमाचे हे क्षण अमूल्य असतात 
न जाणो किती व कसे असतात 
मनाला मात्र ऊब देऊन जातात
प्रेमाचे हे क्षण
कधी हसवतात कधी रडवतात
कधी सुखात सोबत करतात
तर कधी दुःखात सोबत करतात
प्रेमाचे हे क्षण
नसेल जेव्हा आपली व्यक्ती आपल्या जवळ 
तेव्हा कमी येतात 
आठवणीत मग रमवून टाकतात  
एकटेपणात सतत आठवत राहतात 
प्रेमाचे हे क्षण
प्रतीक्षा संपून जेव्हा भेटतो नव्यानी आपण आपल्या माणसाला
एक नजर भरून डोळ्यात साठवून घेतो आपण आपल्या माणसाला
असे असतात हे अमूल्य प्रेमाचे हे क्षण 
नमस्कार मित्रहो,
प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात.

तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा