Nojoto: Largest Storytelling Platform

बालकामगार मी बालकामगार मी तुम्हाला काय सांगू माझी

बालकामगार मी

बालकामगार मी तुम्हाला काय सांगू माझी व्यथा,
बालमजुरी करणे गुन्हा आहे,
असेच म्हणते सारी जनता

पण बालमजुरी करायची मी,
का थांबाऊ सांग,
त्याच्याशिवाय कशी विझेल,
आमच्या भुकेची आग..

अंथरुणाला खिळून बाबा माझे झोपले आहे...
4 पैशांसाठी आई माझी,
लोकांच्या घरी भांडी घासत आहे...
लहान आहे बहीण खूप,
कशी भागऊ सांगा तिची भूक...

बघून माझ्या आईचे हाल,
कप बश्या धुतो मी टपरीवर,
हातभार लावण्यासाठी तिला,
गजरे विकतो कधी सिग्नलवर..

आमच्याकडे बघून कोणी दाखवतो सहानुभूती,
तर कोणी निघून जातो रागात...
खूप काही सहन करावं लागत,
जीवन जगण्यासाठी या जगात..

मुलांना श्याळेत जाताना बघून,
वाटतो त्यांचा हेवा..
अशी ही गरिबी आम्हालाच का दिली तू देवा....

खेळण्याचे,शिकण्याचे वय आमचे,
पण बालपण हे आमचे कधीच संपून गेले,
सांग ना रे देवा अशे किती गुन्हे आम्ही केले...

कशी समझवू मी तुम्हाला, परिस्थिती माझ्या मनाची...
फक्त एकच दिवस नका दाखऊ मया,ठेऊन स्टेटस् मोबाईल वर बालकामगार दिनाची...

©Priyanka Jaiswal
  #बालकामगार मी