Nojoto: Largest Storytelling Platform

आज मावळतांना सूर्य मला काही सांगत होता जप माझ्या

आज मावळतांना सूर्य 
मला काही सांगत होता
जप माझ्या संध्येला 
म्हणून कळवळत होता

होतो तो बावरा,
व्याकुळ तिला भेटण्या,म्हणतो
येते ती संध्या मज भेटाया
का पुढे जाते मग दूर मला लोटण्या

तप्त असा मी बघून तिला गार होतो
माझ्यातल्या ज्वलंत पिवळ्या गोळ्याला
लाल तिच्यावर पुन्हा पुन्हा इश्क़ होतो

तिच्या विरहाने ग्रहणात मी जळतो
बघतो तर काय ती तशीच 
शांत सुखद पुन्हा येऊन थांबते
तरी मी वळण्यातच शहाणपण घेतो
कळून चुकत मला ती माझी नव्हे
पण तिच्या असण्यातच मला पुन्हा 
उगवण्यास अर्थ मिळतो

त्रस्त तो,पुन्हा मावळण्या निघतो
संध्ये साठी तीळ तीळ तुटतो
मिळेल का ती मजला या भ्रमात
रोज जळतो

सुंदर,शांत,निथळ सुर्यालाही
थोडी प्रेमात शांत करून देते
स्वतः निःशब्द राहून,इतरांना
व्यक्त करून जाते ##संध्या
आज मावळतांना सूर्य 
मला काही सांगत होता
जप माझ्या संध्येला 
म्हणून कळवळत होता

होतो तो बावरा,
व्याकुळ तिला भेटण्या,म्हणतो
येते ती संध्या मज भेटाया
का पुढे जाते मग दूर मला लोटण्या

तप्त असा मी बघून तिला गार होतो
माझ्यातल्या ज्वलंत पिवळ्या गोळ्याला
लाल तिच्यावर पुन्हा पुन्हा इश्क़ होतो

तिच्या विरहाने ग्रहणात मी जळतो
बघतो तर काय ती तशीच 
शांत सुखद पुन्हा येऊन थांबते
तरी मी वळण्यातच शहाणपण घेतो
कळून चुकत मला ती माझी नव्हे
पण तिच्या असण्यातच मला पुन्हा 
उगवण्यास अर्थ मिळतो

त्रस्त तो,पुन्हा मावळण्या निघतो
संध्ये साठी तीळ तीळ तुटतो
मिळेल का ती मजला या भ्रमात
रोज जळतो

सुंदर,शांत,निथळ सुर्यालाही
थोडी प्रेमात शांत करून देते
स्वतः निःशब्द राहून,इतरांना
व्यक्त करून जाते ##संध्या
samrudhisawarkar6617

....

New Creator