Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस.. पाऊस म्हणजे चाहूल आनंदाची, पाऊस म्हणजे भाव

पाऊस..

पाऊस म्हणजे चाहूल आनंदाची,
पाऊस म्हणजे भावना,
पाऊस म्हणजे अखंड वाहणार वादळ,
मनात चाललेल्या लाटांच,
प्रवाहाच अन प्रवासचही.

पाऊस म्हणजे स्पर्श,
पाऊस म्हणजे छंद,
पाऊस म्हणजे नातं,
पाऊस म्हणजे गोड गाणं.

पाऊस असतो पारदर्शक,
सर्वकाही स्वच्छ करणारा.
पाऊस असतो शब्द,
नकळत बोलणारा.
पाऊस म्हणजे वाऱ्याची मंद झुळुक,
अंग शहारणारी.
पाऊस म्हणजे टपोरा थेंब,
दवबिंदू म्हणून लकलकणारा.

पाऊस म्हणजे प्रसन्नता मतीत दरवरणारी,
तीला आपलंसं करणारी. 
पाऊस म्हणजे प्रीती ओसंडून वाहणारी.
पाऊस म्हणजे प्रेम बहरणार, फुलणार.
पाऊस म्हणजे उधान सर्वत्र उसळणार.

पाऊस म्हणजे मार्ग
नवीन दिशा दाखवणारा,
पाऊस म्हणजे जाणीव
येणाऱ्या नविन पर्वाची,
पाऊस म्हणजे नकळत मिळणारा ओलावा
जाणिवेचा, जिवन जगण्याचा,
पाऊस म्हणजे स्वप्न
उंच उंच उडण्याचा.


सोनल दारूनकर
पाऊस..

पाऊस म्हणजे चाहूल आनंदाची,
पाऊस म्हणजे भावना,
पाऊस म्हणजे अखंड वाहणार वादळ,
मनात चाललेल्या लाटांच,
प्रवाहाच अन प्रवासचही.

पाऊस म्हणजे स्पर्श,
पाऊस म्हणजे छंद,
पाऊस म्हणजे नातं,
पाऊस म्हणजे गोड गाणं.

पाऊस असतो पारदर्शक,
सर्वकाही स्वच्छ करणारा.
पाऊस असतो शब्द,
नकळत बोलणारा.
पाऊस म्हणजे वाऱ्याची मंद झुळुक,
अंग शहारणारी.
पाऊस म्हणजे टपोरा थेंब,
दवबिंदू म्हणून लकलकणारा.

पाऊस म्हणजे प्रसन्नता मतीत दरवरणारी,
तीला आपलंसं करणारी. 
पाऊस म्हणजे प्रीती ओसंडून वाहणारी.
पाऊस म्हणजे प्रेम बहरणार, फुलणार.
पाऊस म्हणजे उधान सर्वत्र उसळणार.

पाऊस म्हणजे मार्ग
नवीन दिशा दाखवणारा,
पाऊस म्हणजे जाणीव
येणाऱ्या नविन पर्वाची,
पाऊस म्हणजे नकळत मिळणारा ओलावा
जाणिवेचा, जिवन जगण्याचा,
पाऊस म्हणजे स्वप्न
उंच उंच उडण्याचा.


सोनल दारूनकर