Nojoto: Largest Storytelling Platform

◉‘अपेक्षांचे ओझे’◉ अपेक्षांचे ओझे लादले स्वतःवर

◉‘अपेक्षांचे ओझे’◉


अपेक्षांचे ओझे लादले स्वतःवर
शोधतेय मार्ग उगमाच्या अंताचा 
खेळ हा जन्मोजन्मीचा की पूर्व जन्मसंचिताचा
अर्थहीन शब्दांना अर्थपूर्ण शब्द देत मी
अनिर्बंध भावनांच्या मागे अविरत मी
मनाचे किचकट द्वंद उमगू नये स्वतःला म्हणून धावते मी
पूर्णविराम घ्यावा वाटलं कधी धावताना
पण जगण्याचे नसे आयाम आलेच दृष्टीपटलात पुन्हा
देह पंचमहाभूताचा अन् तत्व मातीचे
स्वतःला कधी नाही भेटत स्वतःतला परमेश्वर
विचाराअंती परमेश्वर की विचारांतच ब्रम्हांड
गवसत नाही मी माझ्यातली मला
गुंत्याच्या विचारांची घट्ट गाठ उसवत नाहीये मला!

©Sharmila'S Diary
  अपेक्षांचे ओझे #अपेक्षांचेओझे
#Silence #MyPoetry #mypoetry_mypassion #sharmilasdiary #मराठीकविता #nojoto #nojotomarathi #nojotophoto

अपेक्षांचे ओझे अपेक्षांचेओझे Silence MyPoetry mypoetry_mypassion sharmilasdiary मराठीकविता nojoto nojotomarathi nojotophoto

167 Views