Nojoto: Largest Storytelling Platform

|| प्रश्न पडतो || पुन्हा प्रेम करू की नको हल्ली ह

|| प्रश्न पडतो ||

पुन्हा प्रेम करू की नको हल्ली हाच प्रश्न पडतो
कुणाला जीव लावू की नको हाच प्रश्न पडतो

प्रेम केलं तर व्यक्त होण्याची भीती वाटते
मग प्रेम करून फायदा काय हाच प्रश्न पडतो.

हो! प्रेम केलं ना मी पण,तेच व्यक्त नाही झालो
मग आठवणीतच झुरायचं का हाच प्रश्न पडतो

होत्या अनेक वाटा शाबुत गावातही माझ्या
मग तिचीच गल्ली का छान वाटते हाच प्रश्न पाडतो.

कुणीतरी भेटतं,आवडतं,आवडायला लागतं
मग दुसऱ्यांचा विसर पडतो का ? हाच प्रश्न पडतो

ती नशिबात नव्हती म्हणून आजही दुःख वाटते
मग पुन्हा प्रेम करून पुन्हा रडायचं का हाच प्रश्न पडतो.

बरं बोलताना ती नवी व्यक्ती छान बोलत असते
पण व्यक्त झाल्यावर नकार दिला तर हाच प्रश्न पडतो

ती स्वीकार करेल की नकार देईल हे कोडं सुटत नाही
तुला माझ्यापेक्षाही छान मिळेल असं बोलली तर हाच प्रश्न पडतो.

तीनं स्वीकार केला तर आनंद नकार दिला तर दुःख
आधीच तक्रारी आयुष्याच्या त्यात भर कशाला हाच प्रश्न पडतो

आणि हल्ली प्रेम करणं जमतं तरी कुणाला खेळ चाललायं
मग कशाला आपल्या खऱ्या भावना अनाथ करायच्या हाच प्रश्न पडतो.

                                                 दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #पूर्व