Nojoto: Largest Storytelling Platform

पहारे विसरलो एकदाचा बोचऱ्या खुणांना नको आणखी तू क

पहारे

विसरलो एकदाचा बोचऱ्या खुणांना
नको आणखी तू करू ते इशारे
मिश्किल असे एकदाच हसतेस तू अन
उडतात कितीदा माझ्या झोपे चे पिसारे

चिडतो रडतो कितीदा ओरडतो
तरी तुझे स्तब्ध या मनाची मिनारे
हलू दे कधी तर या हळव्या भावनांना
अन होऊदे ओली या नदीं चे किनारे

डोहात पूर्ण बुडतो सूर्य या ढगांच्या
नव्हे अर्थ असा की खोल झाले ढगारे
कोसळून दवाने या ओघळतील फुलांवर
नव्हे अर्थ असा की रडले फुलारे

सतावतो खूप आता प्रश्न या मनाला
असता मी दुःखात का भाव तुझे ते हसरे
कोठे मी चुकलो प्रश्न केला मी आरशाला
कळले खूप उशिरा किती तू रडली कोंडूनी दारे

खोटाच निरोप आज देतो तिज धाडून
विसर तू ही सगळे मी ही विसरलो ते सारे
माझ्या मला परत कर माझ्या वेदनांना
माझ्या वेदनांचे तुला नको उगाचच पहारे

©yusuf sayyad #पहारे

#Dark
पहारे

विसरलो एकदाचा बोचऱ्या खुणांना
नको आणखी तू करू ते इशारे
मिश्किल असे एकदाच हसतेस तू अन
उडतात कितीदा माझ्या झोपे चे पिसारे

चिडतो रडतो कितीदा ओरडतो
तरी तुझे स्तब्ध या मनाची मिनारे
हलू दे कधी तर या हळव्या भावनांना
अन होऊदे ओली या नदीं चे किनारे

डोहात पूर्ण बुडतो सूर्य या ढगांच्या
नव्हे अर्थ असा की खोल झाले ढगारे
कोसळून दवाने या ओघळतील फुलांवर
नव्हे अर्थ असा की रडले फुलारे

सतावतो खूप आता प्रश्न या मनाला
असता मी दुःखात का भाव तुझे ते हसरे
कोठे मी चुकलो प्रश्न केला मी आरशाला
कळले खूप उशिरा किती तू रडली कोंडूनी दारे

खोटाच निरोप आज देतो तिज धाडून
विसर तू ही सगळे मी ही विसरलो ते सारे
माझ्या मला परत कर माझ्या वेदनांना
माझ्या वेदनांचे तुला नको उगाचच पहारे

©yusuf sayyad #पहारे

#Dark