रानमातीला गहिवर सोसवंना होरपळ जीव झाला तोळामोळा किती जोडावी ठिगळं आस डोळां पाणावाती करपली तृण पाती कसा मोहरे अंकुर? जीव आला काकुलती कर ठेवूनी निढळी तुटं आतडीचा पीळ मागमूस हरपला कुठं वळीवाची सर? तनां- मनांची काहीली कसा वैशाख तापला ताप निवाराया कोण? मेघराजाजी कोपला हिरमुसली पानं- फुलं रंग नव्हाळी सुकला सरीसरीचं गोंदण देह धरणी आसावला काळ्यां नभांच्या राशींनी आसमंत हा उजळू दे मोत्यां- मोत्यांची रांगोळी रान- शिवारी सजू दे ©Shankar Kamble #पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण #Beauty