Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे त्या तळ्याशी मी हरवून आलो पुन्हा शोधण्या स्वत

कुठे त्या तळ्याशी मी हरवून आलो
पुन्हा शोधण्या स्वतःला, मी, मी न राहीलो

मनाच्या तळाशी साचलेले 
तरंगत पुन्हा कंठाशी आले
कुणाच्या गळाशी लागलेले
मनतरंग कोरड्या नयनात न्हाले
आठवलेले साठवलेले 
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच खड्याने ढवळून आलो....

काविरें तळ गहिऱ्या तळ्यांत पाहिले
काही खोल बुडाले काही तरंगले
अनभिज्ञच तळ मनाचा, सुज्ञ ते तळे
न फुटणारे शब्द उथळ, अंतरज्ञ गहिवरले
गहिवरलेले वाहिलेले
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच जळी दडवून आलो....

साचले, साचते, साचेल तळ 
तळ्याच्या तळाशी समरसावी कळ
जिव्हारी लागण्याआधीच झळ
उथळ पाण्याची भुलवी खळखळ
साचून रुचलेले बोचलेले
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच दुभंग करवून आलो..... #rayofhope #Life #poem #Nojoto  #explorethethingsyouhave  #natureinspirarion #lakeview 😍
कुठे त्या तळ्याशी मी हरवून आलो
पुन्हा शोधण्या स्वतःला, मी, मी न राहीलो

मनाच्या तळाशी साचलेले 
तरंगत पुन्हा कंठाशी आले
कुणाच्या गळाशी लागलेले
मनतरंग कोरड्या नयनात न्हाले
आठवलेले साठवलेले 
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच खड्याने ढवळून आलो....

काविरें तळ गहिऱ्या तळ्यांत पाहिले
काही खोल बुडाले काही तरंगले
अनभिज्ञच तळ मनाचा, सुज्ञ ते तळे
न फुटणारे शब्द उथळ, अंतरज्ञ गहिवरले
गहिवरलेले वाहिलेले
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच जळी दडवून आलो....

साचले, साचते, साचेल तळ 
तळ्याच्या तळाशी समरसावी कळ
जिव्हारी लागण्याआधीच झळ
उथळ पाण्याची भुलवी खळखळ
साचून रुचलेले बोचलेले
सारे सारे तळाचे
तळ्याकाठीच दुभंग करवून आलो..... #rayofhope #Life #poem #Nojoto  #explorethethingsyouhave  #natureinspirarion #lakeview 😍
kiransuryawanshi5940

rayansh

New Creator