White घरालगत गोडसर पाण्याची विहीर, देव सहा असले तरी परडीत दहा फुले, निवांत वेळी कानावरती कोकिळेचे गाणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! सुट्टीमध्ये रंगतात इथल्या अंगणात खेळ, शहरात आता कोणाला खरंच असतो का हो वेळ? खाऊसाठी अजूनही आम्हाला पुरेसे आहे नाणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! गाड्या आहेत सर्वांच्या पण गर्दी नाही, पाहुणे रावणे येतात खूप पण वर्दी नाही, मिळून मिसळून अजूनही इथल्या साऱ्यांचे जगणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! पाहू तिकडे उभी आहे हिरवीगर्द झाडी, पिढ्यान् पिढ्या जपली फळा-नारळाची वाडी, अजून काही नको आता यातच सुख मानणे जे आता ठेवलंय तेच यापुढेही जपणे! ©Anagha Ukaskar #good_night poetry #marathi #Nojoto #kavita