आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. प्रीत प्रीत