Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा तो महागाईच्या विळख्यात बांधला जातो... तरीह

पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...
rj2873737205032

RJ Prasad...

New Creator

फक्त आनंदाने जगणं असतं...