Nojoto: Largest Storytelling Platform

फार केलीस थट्टा आमची,काय होता गुन्हा, झालं तेवढं

फार केलीस थट्टा आमची,काय होता गुन्हा, 
झालं तेवढं बास आता,उभं राहूदे पुन्हा.....

जात-पात,धर्म,अहंकार विसरून,आम्ही एक झालोय,
माणूसकी ची माळ गुंफून,तुला सामोरं गेलोय.....

आलास आसुरा सारखा,सगळं विस्कटून टाकलंस,
पाण्यात गेला संसार,घर चिखलाने माखलंस.....

हंबरडा फोडून,डोळ्यादेखत जनावरे गेली वाहून,
लढत राहिलो तरी आम्ही,खांद्याला खांदा लावून......

अन्न-पाणी सोडून,आम्ही लढत-झगडत होतो,
बघ आमची ताकद,आता आम्ही तुलाही मात देतो......

वाटलं असेल तुला,आम्ही शरण येऊ तुला,
पुन्हा एकदा रक्षीण्या आम्हा,तोच वर्दीतला देव आला......