Nojoto: Largest Storytelling Platform

कोणीतरी असावं माझी कविता वाचून थोडं त्याने लाजावं

कोणीतरी असावं
माझी कविता वाचून थोडं त्याने लाजावं
मला पाहून त्याच्या चेहर्‍यावर हसू यावं
नाही भेटले मी दिवसभर तर त्याने बेचैन व्हावं
संध्याकाळी भेटून मला सरप्राईज द्यावं 

कोणीतरी असावं 
माझ्यावर जिवापाड प्रेम करणारं
मनापासुन आठवण काढणारं
डगमगले तर सावरून घेणारं
न बोलता मनातलं ओळखनारं 

कोणीतरी असावं 
ज्याला हक्काने मी आपलं म्हणावं 
स्वतःपेक्षा जास्त मला जपावं
पाहून मला त्याने ही बेधुंद व्हावं 
पावसात माझाबरोबर त्याने ही भिजावं
 
कोणीतरी असावं 
भरकटलेल्या जीवनाला नवी दिशा देणारं
वाहणाऱ्या अश्रू ला डोळ्यातच थांबवणारं
पावलांना योग्य ती पायवाट दाखवणारं
दूर असूनही जवळ भासणारं #कोणीतरी #apekshanb
कोणीतरी असावं
माझी कविता वाचून थोडं त्याने लाजावं
मला पाहून त्याच्या चेहर्‍यावर हसू यावं
नाही भेटले मी दिवसभर तर त्याने बेचैन व्हावं
संध्याकाळी भेटून मला सरप्राईज द्यावं 

कोणीतरी असावं 
माझ्यावर जिवापाड प्रेम करणारं
मनापासुन आठवण काढणारं
डगमगले तर सावरून घेणारं
न बोलता मनातलं ओळखनारं 

कोणीतरी असावं 
ज्याला हक्काने मी आपलं म्हणावं 
स्वतःपेक्षा जास्त मला जपावं
पाहून मला त्याने ही बेधुंद व्हावं 
पावसात माझाबरोबर त्याने ही भिजावं
 
कोणीतरी असावं 
भरकटलेल्या जीवनाला नवी दिशा देणारं
वाहणाऱ्या अश्रू ला डोळ्यातच थांबवणारं
पावलांना योग्य ती पायवाट दाखवणारं
दूर असूनही जवळ भासणारं #कोणीतरी #apekshanb
apekshanb7670

Apeksha NB

New Creator