Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी आहोत आम्ही.....! शिवरायांचे मावळे आम्ही नाह

मराठी आहोत आम्ही.....!

शिवरायांचे मावळे आम्ही
नाही आता झुकणार,
आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी
नाही आता मागे हटणार.
संतांची भूमी पराक्रमाची जननी
हाती तलवार खांद्यावर सासनकाठी ,
सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात
घुमते धन्य ती आमुची मराठी....!

अभिमान नाही तर गर्वच आहे
मला मी मराठी असल्याचा,
युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत
जन्माला आल्याचा.
साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो
रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी,
माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो
धन्य ती आमुची मराठी...!

भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख,
नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप.
आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू,
जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू.
करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस ,
मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..!

आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी
आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी ,
हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा
होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा.
कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर
दारी असते सौभ्याग्याची तुळस ,
मराठी आहोत आम्ही
हीच आमुची खरी ओळख.....!

नाही चालणार आता मनमानी
अन्यायालाही आत्ता थारा नाही ,
छत्रपती शिवराय हेच आमुचे 
मुखी दुसरे नावाचं नाही.
जरी वाहिले रक्ताचे पाट
तरी आता घाबरायचे नाही ,
पुन्हा एकदा नव्याने उभारू
आपल्या  स्वराज्याची उंच गुडी.
आमच्या सांडलेल्या रक्तातही 
दिसणार नाही आता काळोख,
मराठी नाही तर गर्वाने
महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....!

                           Pandhari Varpe
                              8698361992

©Varpe Pandhari मराठी दिवस
मराठी आहोत आम्ही.....!

शिवरायांचे मावळे आम्ही
नाही आता झुकणार,
आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी
नाही आता मागे हटणार.
संतांची भूमी पराक्रमाची जननी
हाती तलवार खांद्यावर सासनकाठी ,
सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात
घुमते धन्य ती आमुची मराठी....!

अभिमान नाही तर गर्वच आहे
मला मी मराठी असल्याचा,
युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत
जन्माला आल्याचा.
साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो
रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी,
माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो
धन्य ती आमुची मराठी...!

भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख,
नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप.
आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू,
जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू.
करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस ,
मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..!

आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी
आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी ,
हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा
होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा.
कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर
दारी असते सौभ्याग्याची तुळस ,
मराठी आहोत आम्ही
हीच आमुची खरी ओळख.....!

नाही चालणार आता मनमानी
अन्यायालाही आत्ता थारा नाही ,
छत्रपती शिवराय हेच आमुचे 
मुखी दुसरे नावाचं नाही.
जरी वाहिले रक्ताचे पाट
तरी आता घाबरायचे नाही ,
पुन्हा एकदा नव्याने उभारू
आपल्या  स्वराज्याची उंच गुडी.
आमच्या सांडलेल्या रक्तातही 
दिसणार नाही आता काळोख,
मराठी नाही तर गर्वाने
महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....!

                           Pandhari Varpe
                              8698361992

©Varpe Pandhari मराठी दिवस

मराठी दिवस