Nojoto: Largest Storytelling Platform

#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहा

 #लाडकी

तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिला जोवर काही फारस येत नसे तोवर हे..ती जसजशी मुरायला लागली संसारात तस तशी ती नावडती होत गेली सासूची ...त्यात हिचा स्वभाव, झोकुन देण्याचा...जे करेल ते निटनेटके...निगुतीने, वेळेत..साहित्याची जाण उत्तम, रांगोळी सुंदर काढत असे, घर  छान ठेवी..सगळ्यांशी लाघवीपणे  वागत  बोलत असे. सगळ्यांची लाडकी  व्हायला इतकं पुरेसं  होतं की..पण तिथुन मग सासूबाईंची कुरबुर सुरु झाली. हिचं काहीच मनास येइना..मग उगाच तिला काहीतरी खर्चावरुन बोल, मुलाकडे कागाळ्या कर, तिच्या प्रत्येक गोष्टित नाक खुपस असे उदयोग नेहमीच सुरु झाले...मोठं म्हणाल तर काही इशू नाही पण बारीक बारीक खोडया सुरुच...डोक्याला त्रास नुसताच.

बरं, सुन बिचारी जुन्या वळणाची, मोठ्याना उलट उत्तर द्यायचं नाही या संस्कारात वाढलेली..नवरा सतत बाहेरच, त्याचे मित्र,नोकरी, बैडमिंटन,यांव नी त्यांव!!!

बिचारी मनात धुमसत राही..तिने यातून मग असा मार्ग काढला की त्या म्हणतील तसं करायचं आणि तरीही नाही आवडल तर बोलण्याकडे  चक्क दुर्लक्ष करायचं...काय भांडण -वाद करायचेत की काय घरात?? सुशिक्षित न आपण दोघीही?

sandyjournalist7382

sandy

New Creator

#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिला जोवर काही फारस येत नसे तोवर हे..ती जसजशी मुरायला लागली संसारात तस तशी ती नावडती होत गेली सासूची ...त्यात हिचा स्वभाव, झोकुन देण्याचा...जे करेल ते निटनेटके...निगुतीने, वेळेत..साहित्याची जाण उत्तम, रांगोळी सुंदर काढत असे, घर छान ठेवी..सगळ्यांशी लाघवीपणे वागत बोलत असे. सगळ्यांची लाडकी व्हायला इतकं पुरेसं होतं की..पण तिथुन मग सासूबाईंची कुरबुर सुरु झाली. हिचं काहीच मनास येइना..मग उगाच तिला काहीतरी खर्चावरुन बोल, मुलाकडे कागाळ्या कर, तिच्या प्रत्येक गोष्टित नाक खुपस असे उदयोग नेहमीच सुरु झाले...मोठं म्हणाल तर काही इशू नाही पण बारीक बारीक खोडया सुरुच...डोक्याला त्रास नुसताच. बरं, सुन बिचारी जुन्या वळणाची, मोठ्याना उलट उत्तर द्यायचं नाही या संस्कारात वाढलेली..नवरा सतत बाहेरच, त्याचे मित्र,नोकरी, बैडमिंटन,यांव नी त्यांव!!! बिचारी मनात धुमसत राही..तिने यातून मग असा मार्ग काढला की त्या म्हणतील तसं करायचं आणि तरीही नाही आवडल तर बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष करायचं...काय भांडण -वाद करायचेत की काय घरात?? सुशिक्षित न आपण दोघीही? #story #nojotophoto