Nojoto: Largest Storytelling Platform

"सांजवेळ" आज मी अंगणात एकटीच बसले होते, मनामध्ये

"सांजवेळ"

आज मी अंगणात एकटीच बसले होते,
मनामध्ये विचारांनी थैमान घातले होते.
मनामध्ये प्रश्नांची यादीच तयार होती,
पण उत्तरांसाठी शब्दांची जुळवाजुळवच होत नव्हती..!

देव आहे, देव नाही
याने आता काहीच फरक पडत नाही..
कारण आयुष्यातील अडचणींचा शेवटच काही होत नाही..!
आकाशात तारे चमचम करत होते..
क्षणात आहे तर क्षणात नाहीसे होत होते..
पण तरीही ते चमकायचे सोडत नव्हते..!
जेथे प्रश्न असतात, तेथे उत्तरही नक्की असतं,
वेळ आल्यावर ते सापडतच जातं..!

मग मनात विचार आला
अंध:कार सरला आता ,
दिसेल सुर्यप्रकाश ..
उमेद नव्या स्वप्नांची,
सुटेल काळोखाचा ही पाश ...!
हे चक्र असेच राहावे ,
ना लागो नजर याला कुणाची ..
'सांजवेळ' जरा लवकरच व्हावी ,
मिळो संधी चंद्र अन् ताऱ्यांच्या भेटीची...!

"भावनांचे विश्व "  (प्राजक्त)
             स्वलिखित - प्राजक्ता फाळके #solace #भावनांच्या विश्वात#Feeling.. #sadnesslifequote .# दिल की बात..❤️

nojotouser3932868650

@Praju..

New Creator