Nojoto: Largest Storytelling Platform

आज अचानक ती भेटली अन् पुरता अडकलो इतक्या वर्षांपास

आज अचानक ती भेटली
अन् पुरता अडकलो
इतक्या वर्षांपासून तिला टाळत होतो
पण आज भेटलोच एकामेकांना
तशी ती समजूतदार आहे
आजवर मी दिलेल्या सबबी पटल्यात तिला
पण आज तिच्याशी नजरानजर करायला भीती वाटत्ये
काय विचारेल? कोणते वचन मागेल?
काय बोलणार आहे मी? स्पष्टीकरणं, कारणं जमतील का द्यायला?
परिस्थितीचे कारण देऊन जमणार नाही....कारण त्याही प्रवासात ती एका अनोळखी प्रवाशासारखी सोबतच होती...
न राहवून तिनेच पहल केली.....
ओळखलं का? की विसरलास?
मी दुर जाताना काहीच भेट दिली नाहीस
निदान चार शब्द तरी द्यायचे सोबतीला म्हणून
अगं तू गेल्यावर मी व्यक्तच झालो नाही
तू नसताना अक्षरांच्या जवळपासही फिरकलो नाही
तुला दुर करुन काय साध्य केले आहे मी?
बहुधा एकटाच पडलोय केव्हाचा!
अन् आताशा सवय झाली आहे एकटेपणाची मला आणि तुलाही........ कदाचित!!!
आता तुला रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत....
क्षमा कर.........हे कविते...........
©️ Swapnil Jadhav
#Pennings
#Swapys_Diaries
#Love_for_words #Pennings
#Swapys_Diaries
#Love_for_words