वाटेत कुठेतरी शाळेतली मैत्रीण भेटली तर ? तिला बोलावं की समोर जावं कळत नाही तिच्याशी बोलणं बोलल्यासारखं होईल का ? की संशयाला निमंत्रण असेल काही कळत नाही. आमच्या दोघांचं नात मैत्रीचचं आहे तरी पण भर रस्त्यात तिच्याशी बोलणं योग्य आहे का ? आम्ही बोलूही जुने मित्र, जुनी ओळख म्हणून पण बघनाऱ्यांच्या डोळ्यांना ते खपेल का. ? शहरातली बात वेगळी तिथे संशयात नातं आहे गावाकडे मात्र संशयातलं नातं ते नातं राख आहे, गावाकडे ठेवली जाते बघा नजर नजरेवर मग त्यांना आम्ही कसे निष्पाप वाटू हा प्रश्न आहे. म्हणून कुठे कधी भेटलाच तर बघावं एकमेकाकडे आणि स्मित हास्यात सांगावं स्वतःची काळजी घे जशी शाळेत मैत्री होती तशीच आजही आहे पण फक्त ती मैत्री आता अबोल आहे एवढेच लक्षात घे. दिपक कोळसकर ©Dipak kolaskar मराठी कविता प्रेम